mandesh

mandesh

mandesh

By mandesh.sanju 7 January 2013 @ 10:06am

सलग दुसऱ्यावर्षीही माणदेश महोत्सवाने रेकॉड ब्रेक प्रतिसाद मिळविला. या वर्षी समारोपाच्या कार्यक्रमास खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पूर्णवेळ सहभागी झाले होते. केवळ माणदेशातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना ताकद देण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून झाला. या कार्यक्रमासाठी आलेल्या कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी श्री. गोरे यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांना आगामी काळात सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. माण तालुक्‍यात दिवाळीनंतर लगेचच झालेल्या महोत्सवातील पाच दिवसांच्या कार्यक्रमांनी पुन्हा एकदा सणाचे वातावरण झाले. येथील जनतेला विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळाली, त्याबरोबरच माणदेश गौरव पुरस्कारातून तरुणांना प्रेरणा मिळाली.